मागच्या दारानं सरकार स्थापन करण्यात भाजपला कसलाही रस नाही- देवेंद्र फडणवीस

Thote Shubham
राज्यात कोरोनासोबत राजकारणही शिगेला पाहोचलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधीमंडळ सदस्यत्व होण्याचा अवधी जवळ येऊ लागला आहे. पण निवडणुका रद्द झाल्यान सरकारनं राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या ठरावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सेना-भाजपमध्ये खडाजंगी सुरू आहे.


मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा ठरावावर भाजपकडून राज भवनाच्या माध्यमातून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. शिवसेनेचा हा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे.


भाजपला राज्यात अस्थिरता नको आहे. राज्यात अस्थिरता आणण्यात आणि मागच्या दारानं सरकार स्थापन करण्यात भाजपला कसलाही रस नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आल्याचं आणि भविष्यातही मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना पाहून भाजपला आनंदच होणार असंही फडणवीस यांनी म्हटं. आहे.

Find Out More:

Related Articles: