IFSC गुजरातला हलवण्याचा निर्णय धक्कादायक, शरद पवारांचं मोदींना पत्र

Thote Shubham
मुंबई : IFSC गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मुंबईतून सेंटर हलवण्याला आपला विरोध दर्शवला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्यालयाला त्यासंबंधीचं सविस्तर पत्र लिहिलं आहे.


मुंबई ही देशाची अर्थिक राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मुंबईला आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे. अशावेळी मुंबईत होणारं IFSC सेंटर डायरेक्ट गुजरातला हलवणं म्हणजे मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न यामधून केला गेला असल्याचा निशाणा त्यांनी केंद्र सरकारवर साधला आहे.


अनेक वर्षांपासून मुंबईला आंतरारष्ट्रीय स्तरावर देखील आर्थिक केंद्र मानण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्राने घेतलेल्या निर्णयाने फक्त मुंबईचं नाही तर देशाचं नुकसान होऊ शकतं, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे. 


तर कोणतेही राजकीय मतभेद असतील विशेषत दोन राज्यांमधलं जे राजकारण आहे ते विसरून याबाबत निर्णय घेणं अपेक्षित आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गुजरातमध्ये आयएफएससी स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईत स्थानांतरित करण्याची विनंती पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.

https://mobile.twitter.com/PawarSpeaks/status/1256825384500293633?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed&ref_url=https%3A%2F%2Fd-6450308401731984565.ampproject.net%2F2004240001480%2Fframe.html

Find Out More:

Related Articles: