औरंगाबादमध्ये रेल्वे रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू
लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली असावी, असा अंदाज आहे.
पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या मालवाहू रेल्वेखाली हे मजूर चिरडले गेले. मालगाडीने 19 मजुरांना धडक दिली. यामध्ये 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.हे परप्रांतीय मजूर मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. करमाड पोलीस दुर्घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.