पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी साधणार संवाद

Thote Shubham
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. 3 मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच 17 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चाही केली होती.

त्यामुळे आज ते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लॉकडाउनमध्ये राज्यांनी अधिकारांच्या विकेंद्रीकरणाची मागणी पंतप्रधानांकडे केली होती.

तामिळनाडू, तेलंगण, छत्तीसगड, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी प्रवासी रेल्वे सुरू करण्यास विरोध करत लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची सूचना केली. तर लॉकडाउन उठवण्याबाबत ठोस धोरण आणि दिशा हवी, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली होती.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान देशातील लॉकडाऊन वाढवला जाण्याचेही संकेत मिळाले होते.

Find Out More:

Related Articles: