विरोधक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

frame विरोधक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Thote Shubham
शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपली उत्पादने विकूच नये, अशी काही लोकांची इच्छा असून हे लोक शेतकऱ्यांसाठी पूजनीय असलेल्या वस्तू आणि उपकरणे जाळून शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

राजधानी दिल्लीत राजपथावर आंदोलनात सोमवारी एक ट्रॅक्टर जाळण्यात आला होता. या आंदोलनात पंजाब युवक काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होते. यासंदर्भात मोदी यांनी आंदोलकांवर टीकेची झोड उठवली आहे.

हे लोक ना शेतकºयांसोबत आहेत, ना तरुणांसोबत, ना सैनिकांसोबत, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.            

                  

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More