जास्त गर्दीत फिरायची सवय नसल्याने राहुल गांधी पडले - रावसाहेब दानवे

frame जास्त गर्दीत फिरायची सवय नसल्याने राहुल गांधी पडले - रावसाहेब दानवे

Thote Shubham
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी धक्काबुक्की झालीच नाही असा दावा केलाय.
राहुल गांधींना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही. त्यामुळे ते पडले. विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्ही देखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो, असं दानवे म्हणालेत.

                                                                

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More