दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये - रामदास आठवले

frame दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये - रामदास आठवले

Thote Shubham
केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत. हाथरसची कन्या मृत्युची झुंज देत होती तेव्हा आयुष्यमान आठवले नटींच्या घोळक्यात होते, अशी टीका सामनामधून राऊतांनी आठवलेंवर केली होती. यावर आठवलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दलित अत्याचार जिथे होईल तिथे मी पोहोचलो आहे. दलित अत्याचाराविरूद्ध मी लढलो आहे. मी दलित पँथरच्या चळवळीतून पुढे आले आहे. त्यामुळे दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की माहित नाही पण मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असल्याचं आठवले म्हणाले.

                                                                         

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More