सिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन
स्वित्झर्लंड: बॅडमिंटनपट्टू पी. व्ही. सिंधूने अखेर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचा मान मिळवला आहे. आत्तापर्यंत सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन वेळा प्रवेश मिळविला होता. तिसऱ्यांदा प्रवेश केल्यांनतर तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करत जेतेपद पटकावले आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
आजच सिंधूच्या आईचा वाढदिवस असल्याने हे सुवर्णपदक आईला बर्थ डे गिफ्ट असल्याचे मत सिंधूनं सामन्यानंतर व्यक्त केले. सिंधूने पसुरवातीपासूनच आक्रमक खेळण्याला सुरवात केल्याने ओकुहाराला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. या वेळी तिच्या समर्थकांकडून गणपती बाप्पा मोरया आणि वंदे मातरम म्हणत तिला प्रोत्साहन देण्यात येत होते. पहिल्याच गेममध्ये सिंधूने अवघ्या १६ मिनिटांत २१-७ अशी आघाडी घेतली होती.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सिंधू म्हणाली,” या क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहत होती. हा विजय माझ्यासाठी खास आहे. आजच्याच दिवशी हा विजय मिळवल्यानं आनंद द्विगुणित झाला आहे. कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. ही तिला माझ्याकडून मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्तम भेट असेल.”