आयपीएलमध्ये लागू होऊ शकतो ‘पॉवर प्लेयर’ नियम

Thote Shubham

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) इंडियन प्रिमियर लीगमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आयपीएलच्या पुढील हंगामात पॉवर प्लेयर नियम आणण्याविषयी विचार करत आहे. या नियमांतर्गत या संघ विकेट पडल्यानंतर अथवा ओव्हर संपल्यानंतर खेळाडू बदलू शकेल.

बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या निर्णयावर मुंबईमध्ये होणाऱ्या आयपीएल गव्हर्नर काउंसिल बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा स्थितीवर विचार केला जात आहे, जेथे 11 खेळाडूं ऐवजी 15 खेळाडूंची निवड केली जाईल आणि एक खेळाडू मॅच दरम्यान विकेट पडल्यानंतर अथवा ओव्हर संपल्यानंतर कधीही बदलला जाऊ शकेल. आम्ही हा नियम आयपीएलमध्ये लागू करण्याचा विचार करत आहोत, मात्र आगामी सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा नियम लागू करणे योग्य असेल.

त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे सामन्याचे स्वरूपच बदलून जाईल. एखाद्या खेळाडूमुळे सामन्याचा निर्णयच बदलू शकतो.

मोक्याच्या क्षणी एखाद्या महत्त्वाच्या खेळाडूला मैदानात आणून सामना फिरवला जाऊ शकतो. आयपीएलचे आगामी सीझन आणखी लोकप्रिय कसे बनविता येईल, या दृष्टीने सध्या विचार केला जात आहे.


Find Out More:

Related Articles: