आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली, जसप्रीत बुमराह अव्वल

Thote Shubham

मुंबई : आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या या यादीत विराट कोहलीच्या खात्यात सर्वाधित 895 गुणांची नोंद आहे.

कोहलीपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा 863 गुणांसह आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह दुखापतीनंतरही 797 गुणांसह आपला पहिला नंबर टिकवून आहे.

सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा सुपर फॉर्ममध्ये आहे. रोहित क्रमवारीच्या बाबतीत सध्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-20तील टॉप टेन फलंदाजांमध्ये आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात रोहितने 25 एकदिवसीय सामन्यात 1232 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तब्बल सहा शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

सध्या पाठीच्या दुखापतीवर जसप्रीत बुमराह उपचार घेत आहे. पण तरीही दुसऱ्या क्रमांकावरच्या ट्रेन्ट बोल्टपेक्षा मोठ्या फरकाने पहिला क्रमांक राखून आहे. न्यूझीलंडचा बोल्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये 740 गुणांसह दुसऱ्या तर अफगाणिस्तानचा मुजीब उर रेहमान तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या दहाव्या क्रमांकावर आहे.


Find Out More:

Related Articles: