आयपीएल २०२० लिलाव: ७३ जागांसाठी तब्बल ९७१ खेळाडूंची नोंदणी; या देशाचे सर्वाधिक खेळाडू

Thote Shubham

आयपीएल 2020 च्या लिलावाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. आयपीएलच्या या 13 व्या मोसमासाठी होणाऱ्या लिलावाच्या तयारीला सर्व संघांनी सुरुवात केली आहे.  हा लिलाव 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे.

या लिलावासाठी खेळाडूंना नोंदणी करण्याची 30 नोव्हेंबर अखेरची तारिख होती. त्यामुळे तोपर्यंत या लिलावासाठी तब्बल 971 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये 713 भारतीय खेळाडू आणि 258 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. परदेशी खेळाडूमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 55 खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

विषेश म्हणजे 2020 आयपीएलसाठी सर्व संघांच्या मिळून एकूण केवळ 73 खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी 215 कॅप खेळाडूंनी (किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू) नोंदणी केली आहे. तर 754 अनकॅप खेळाडूंनी (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेला खेळाडू) नोंदणी केली आहे. त्याचबरोबर 2 खेळाडू सहसदस्ययी संघाचे आहेत.

 

त्याचबरोबर नोंदणी केलेल्या भारताच्या खेळाडूंमध्ये 19 कॅप खेळाडू आहेत. तर 634 अनकॅप खेळाडू आहेत. तसेच 60 असे खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही पण आयपीएलमध्ये एकतरी सामना खेळले आहेत. त्याचबरोबर नोंदणी केलेल्या 258 परदेशी खेळाडूंमध्ये 196 कॅप खेळाडू आहेत. तर 60 अनकॅप खेळाडू आहेत. तसेच 2 सहसदस्ययी संघाचे खेळाडू आहेत.

 

आता 9 डिसेंबरपर्यंत सर्व संघाना त्यांनी निवडलेल्या अंतिम खेळाडूंची यादी सादर करायची आहे. त्यानंतर लिलावासाठी अंतिम खेळाडूंची यादी तयार केली जाईल. तसेच मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही ह्यूज एजमेड्स हेच लिलावकर्ता म्हणून भूमिका पार पाडणार आहेत.

Find Out More:

Related Articles: