विराट कोहलीच्या विक्रमांमध्ये आणखी एका विक्रमाची भर

Thote Shubham

पुणे : आणखी एका विक्रमाची भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमांमध्ये भर पडली असून विराटने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. कर्णधार म्हणून सर्वात जलद 11 हजारांचा टप्पा विराटने पार केला आहे. विराटने याबाबतीत महेंद्रसिंह धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगलाही पछाडले आहे.

 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 1 धाव काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा विराट कोहली जगातील सहावा आणि भारताचा दुसरा कर्णधार बनला आहे. याआधी भारताकडून महेंद्रसिंह धोनीने अशी कामगिरी केली आहे. या यादीत विराट कोहलीसह आता रिकी पॉटिंग, ग्रॅम स्मिथ, महेंद्रसिंह धोनी, अॅलन बॉर्डर, स्टीफन फ्लेमिंग यांचा समावेश आहे.

 

196 डावांमध्ये विराट कोहलीने 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तर 252 डावांमध्ये ही कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगने केली होती. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने 264 डावांमध्ये 11 हजार धाव पूर्ण केल्या होत्या. तर अॅलन बॉर्डरने 316 आणि महेंद्रसिंह धोनीने 324 डावांमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.                                                                              

Find Out More:

Related Articles: