प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित होणार जसप्रीत बुमराह

Thote Shubham

मुंबई – प्रतिष्ठेच्या ‘पॉली उम्रीगर’ पुरस्काराने टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ जसप्रीत बुमराहला सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार बीसीसीआयने निवडलेल्या वर्षभरातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला दिला जातो. तर सर्वोत्तम महिला क्रिकेटरचा सन्मान महिलांमध्ये पूनम यादव हिला मिळाला आहे.

 

बीसीसीआयने ट्विटरवरून २०१८-१९ या वर्षासाठी या पुरस्कारांची घोषणा केली. बुमराहने जानेवारी २०१८ मध्ये आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत पदार्पण केले. बुमराह हा आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि विंडीजविरूद्ध बळींचे पंचक मिळवणार आशियातील एकमेव गोलंदाज आहे. त्याचबरोबर बुमराहचा २०१८-१९ मध्ये कसोटीत सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल दिलीप सरदेसाई पुरस्कारानेदेखील सत्कार करण्यात येणार आहे.

 

तर, सर्वोत्तम महिला क्रिकेटरचा सन्मान महिलांमध्ये अर्जुन पुरस्कार विजेती पूनम यादवला मिळाला आहे. कर्नल सी.के. नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार आणि महिलांसाठी बीसीसीआय लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार भारताचे माजी कर्णधार कृष्णामचारी श्रीकांत आणि अंजुम चोप्रा यांना अनुक्रमे देण्यात येणार आहे.

Find Out More:

Related Articles: