या कारणामुळे झाला पराभव, स्मिथने केला खुलासा
शुक्रवारी (17 जानेवारी) राजकोट येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासंघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामनापार पडला. हा सामना भारताने 36 धावांनी जिंकला तसेच मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.
सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथ म्हणाला, मधल्या षटकामध्ये कमी वेळात तीन विकेट गमावल्यामुळे आमच्या संघाला भारताविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 36 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 340 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 304 धावांवर सर्वबाद झाला. तसेच स्मिथ म्हणाला आम्ही तेव्हाच सामना गमावला जेव्हा 30 ते 40 षटकामध्ये आम्ही तीन विकेट गमावले. आमच्या जवळ असा कोणताच फलंदाज नव्हता की जो जलद गतीने धावा करू शकेल.
मार्नस लॅब्यूशाने 31व्या षटकात बाद झाला, कुलदीप यादवने 38व्या षटकात प्रथम एलेक्स कॅरीला बाद केले नंतर स्मिथला त्रिफळाचीत करून सामना भारताच्या बाजूने फिरवला. स्मिथ पुढे म्हणाला, मार्नसने वनडे क्रिकेटच्या आपल्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. आम्ही काही वेळ एका षटकात 6 धावांची धावगती राखून चांगल्या धावसंख्येने पुढे जात होतो. मला वाटते की तेव्हा धावाची गती चांगली होती, पंरतू 30 ते 40 षटकांच्यामध्ये तीन विकेट गमावल्यामुळे सामन्याची दिशा बदलली.
तसेच स्मिथ म्हणाला, भारताच्या विजयामध्ये मधल्या फळीमध्ये झालेली भागीदारी महत्वाची होती. आम्ही वनडे सामन्यासाठी आमची सामन्य रणनीती वापरली. गोलंदाजी करताना आमची रणनीती विकेट घेण्याची आणि धावाची गती कमी करण्याची होती. विराट कोहली, शिखर धवन, आणि केएल राहूलने चांगली फलंदाजी केली. त्यांनी मधल्या काही षटकात चांगली भागीदारी केली.
या सामन्यात स्मिथने 98 धावांची खेळी केली. तर लॅब्यूशानेने 46 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून कोणालाही खास खेळ करता न आल्याने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला.
आपल्या खेळीबद्दल स्मिथ म्हणाला, धावा करने चांगले आहे, मी थोडा वेळ आणखी मैदानावर टिकून असतो तर मी संघाला लक्ष्या पर्यत पोहचवले असते. मी चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात बाद झालो. हे संघासाठी वाईट झाले. त्यात आम्ही एलेक्स कॅरीची सुद्धा विकेट त्या षटकातच गमावली.