२९ फेब्रुवारीला खेळले गेलेत १८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने

Thote Shubham

आजचा दिवस तसा विशेषच आहे कारण २९ फेब्रुवारी नेहमी नेहमी नाही तर चार वर्षांतून एकदाच येणारी तारीख आहे. अशा या विशेष दिवशी भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी आज आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आपला पुरुष संघाच्या न्यूझीलंडविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आज ख्राईस्टचर्चला सुरूवात झाली तर आपल्या महिला संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेवर विजय मिळवला.

 

याशिवाय आजच दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया, थायलंड व सिंगापूर आणि मलेशिया व नोपाळ दरम्यान पुरुषांचे वन डे सामने खेळले गेले तर टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या महिलांनी बांगलादेशला मात दिली.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात २९ फेब्रुवारीला पहिल्यांदाच एवढे सामने खेळले गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा अधिकृत इतिहास १८७७ पासूनचा असला तरी १९६८ पर्यंत २९ फेब्रुवारीला एकाही सामन्याची सुरूवात झाली नव्हती मात्र तेंव्हापासून आतापर्यंत पुरुषांच्या क्रिकेटमध्ये १८ सामने एकतर २९ फेब्रुवारीला सुरु झाले किंवा खेळले गेले. महिला क्रिकेटचे असे ६ सामने आहेत.

 

योगायोग म्हणजे जे भारत व न्यझीलंडचे संघ आजपासून ख्राईस्टचर्चला दुसरा कसोटी सामना खेळत आहेत, त्यांच्यातच २९ फेब्रुवारीला सुरू होणारा सर्वात पहिला सामना १९६८ मध्ये वेलिंग्टन येथे खेळला गेला होता.

२९ फेब्रुवारीला सुरुवात झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने (पुरुष)

वर्ष— सामना—संघ १—संघ २— ठिकाण
२०२०— कसोटी— भारत— न्यूझीलंड— ख्राईस्टचर्च
२०२०— वन डे— द.आफ्रिका— ऑस्ट्रेलिया— पार्ल
२०२०— टी २०— थायलंड— सिंगापूर— बँकॉक
२०२०— टी २०— मलेशिया— नेपाळ— बँकॉक
२०१६— टी २०— पाकिस्तान— अमिराती— ढाका
२०१२— वन डे— न्यूझीलंड— द.आफ्रिका— नेपियर
२००८— कसोटी—बांगलादेश— द.आफ्रिका— चित्तोग्राम
२००८— वन डे— ऑस्ट्रेलिया—श्रीलंका— मेलबोर्न
२००४— वन डे— श्रीलंका— ऑस्ट्रेलिया— कोलंबो
२००४— वन डे— न्यूझीलंड— द.आफ्रिका— ऑकलंड
१९९६— वन डे— पाकिस्तान— द.आफ्रिका— कराची
१९९६— वन डे— विंडीज— केनिया— पुणे
१९९२— वन डे— न्यूझीलंड— द.आफ्रिका— ऑकलंड
१९९२— वन डे— विंडीज— झिम्बाब्वे— ब्रीजटाऊन
१९८४— वन डे— विंडीज— ऑस्ट्रेलिया— अल्बियान
१९८०— कसोटी— न्यूझीलंड— विंडीज— ऑकलंड
१९६८— कसोटी— विंडीज— इंग्लंड— ब्रिजटाऊन
१९६८— कसोटी— भारत— न्यूझीलंड— वेलिंग्टन

महिला क्रिकेट
२०२०— टी २०— भारत— श्रीलंका— मेलबोर्न
२०२०— टी २०— बांगलादेश— न्यूझीलंड— मेलबोर्न
२०१६— वन डे— द.आफ्रिका— विंडीज— इस्ट लंडन
२०१२— वन डे— विंडीज— भारत— बासटेरे
२००४— वन डे— विंडीज— भारत— जमशेटपूर
२००४— वन डे— द.आफ्रिका— इंग्लंड— जोहान्सबर्ग

Find Out More:

Related Articles: