माजी फिरकीपटू सुनील जोशी बीसीसीआयचे नवे निवड समिती प्रमुख

frame माजी फिरकीपटू सुनील जोशी बीसीसीआयचे नवे निवड समिती प्रमुख

Thote Shubham

मुंबई: माजी फिरकीपटू सुनील जोशी यांची भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यमान निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांची सुनील जोशी जागा घेतील. बुधवारी ही घोषणा बीसीसीआयच्या पाच जणांच्या निवड समितीने केली.

 

माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामनकृष्णन, राजेश चौहान, हरिंद्रर सिंह, वेंकटेश प्रसाद या पाच जणांच्या मुंबईत निवड समितीच्या प्रमुखपदासाठी मुलाखती झाल्या. येत्या १२ मार्चपासून होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला भारतीय संघाची निवड करावी लागेल.

 

भारताकडून खेळताना सुनील जोशी यांनी १५ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत ४१ तर एकदिवसीय सामन्यात ६९ बळी घेतले आहेत. तसेच त्यांनी कसोटीत ९२ तर एकदिवसीय सामन्यात नाबाद ६१ ही सर्वोच्च खेळी केली होती. याशिवाय त्यांनी १६० प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मधील १६३ सामने खेळले आहेत.                                                                                                                              

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More