भारतीय महिला संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

Thote Shubham

पावसामुळे आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला असून भारतीय महिला संघाने गुणांच्या आधारावर अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाला टी-२० च्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठता आली आहे.

 

सकाळापासून सिडनी मैदानावर पावसाने हजेरी लावली होती. सामना सुरू होण्यासाठी अखेरची वेळ ११.०६ मिनिटे होती. पण पावसामुळे नाणेफेक देखील न होऊ शकल्यामुळे सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा पंचानी केली.

 

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ अपराजित राहून अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारताची अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. भारत याआधी २००९, २०१० आणि २०१८ मध्ये उपांत्य फेरीत दाखल झाला होता.

 

दरम्यान, याच मैदानावर दुपारी आयसीसी विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ही लढत होणार आहे. जर लढत देखील पावसामुळे रद्द झाल्यास ग्रुप फेरीतील गुणांच्या आधारे आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत दाखल होईल.                                                                                                            

Find Out More:

Related Articles: