या नवीन फिचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप होणार अधिक सुरक्षित

व्हॉट्सअ‍ॅप अँड्राईड युजर्ससाठी लवकरच फिंगरप्रिंट लॉक फिचर आणणार आहे. आयओएस युजर्ससाठी हे फिचर आधीपासूनच उपलब्ध आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप हे नवीन फिचर अँड्राईड बीटा युजर्सवर टेस्ट करणार आहे. हे फिचर बीटा वर्जन 2.19.221 मध्ये उपलब्ध होईल. मात्र हे डिफॉल्ट रूपात बंद असेल, जे तुम्हाला फिचर वापरण्यासाठी ऑन करावे लागेल. या नवीन फिचरमुळे युजर्स आपल्या व्हॉट्सअ‍ॅपला अधिक सुरक्षित करू शकतात.

याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन बीटा वर्जनमध्ये शो कंटेट इन नॉटिफिकेशनचा पर्याय देखील असणार आहे. यामध्ये युजर्सकडे परवानगी असेल की, फिंगरप्रिट इनेबल असताना देखील मेसेज हाइड करू शकतो.

हे फिचर ऑन करण्यासाठी युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपच्या सेंटिंगमध्ये जावे लागेल येथे अकाउंट असा पर्यायवर क्लिक केल्यानंतर प्रायव्हेसी असा पर्याय असेल. जेथे फिंगरप्रिट ऑन-ऑफच विक्लप असेल. हे फिचर वापरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी अँड्राईड मार्शमेलो अथवा त्याच्या पुढील अँड्राईड व्हर्जन असणे आवश्यक आहे.

हे फिचर ऑन केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल. ऑटोमेटिक लॉकसाठी त्वरित, ऑफर 1 मिनिट आणि ऑफर 30 मिनिट असे तीन विकल्प असतील. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार निवड करू शकता.

आयओएस युजर्सला 15 मिनिट लॉकचा पर्याय मिळतो. सध्या हे व्हर्जन केवळ बीटा  युजर्ससाठीच आहे. लवकरच हे फिचर लाँच करण्यात येणार आहे.


Find Out More:

Related Articles: