या स्मार्ट फोनमध्ये मिळणार तब्बल चार रिअर कॅमेरे
शाओमीचा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 8 बद्दलचे अनेक लीक रिपोर्ट्स समोर येत आहेत. रेडमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रँगन 665 प्रोसेसर असेल. याचबरोबर फोनमध्ये चार रिअर कॅमेरे असणार आहेत, ज्यामध्ये मेन कॅमेरा 48 मेगापिक्सल असेल. रेडमीचे जनरल मॅनेजर लू वेबिंगने रेडमी नोट8 च्या कॅमेऱ्याचे सँपल देखील शेअर केले.
टीझरनुसार, शाओमी रेडमी नोट 8 मध्ये चार रिअर कॅमेरे असतील आणि कॅमेऱ्यासोबतच डुअल एलईडी फ्लॅश लाइट देखील मिळेल. चार रेअर कॅमेऱ्यामध्ये मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल. तर एक कॅमेरा वाइड एंगल असेल, एक लेंस डेफ्थ ऑफ फिल्ड आणि तिसरा कॅमेरा मॅक्रो लेंस असेल. कॅमेऱ्यासोबतच सुपर नाइट मोड देखील मिळेल, जे रात्री आणि कमी प्रकाशात फोटोग्राफी करण्यास मदत करेल.
या फोनमध्ये स्नॅपड्रँगन 665 प्रोसेसर, ग्राफिस्कसाठी एड्रेनो 610 जीपीयू असेल. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस देखील सपोर्ट करेल. रेडमी नोट 8 सिरीज 29 ऑगस्टला लाँच होणार आहे. या फोनमध्ये 45000 एमएएच बॅटरी मिळू शकते.