“चांद्रयान 2″चे लॅन्डरची चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने वाटचाल
“चंद्रयान -2′ चे लॅंडिंग मॉड्यूल ‘विक्रम’ बुधवारी चंद्राच्या अधिक जवळ आले आणि त्याची कक्षा आणखी कमी झाली. त्यामुळे शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची ऐतिहासिक प्रक्रिया सुरू होईल. या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातल्या हायस्कूलमधील 60 विद्यार्थ्यांसह बंगळुरुमधील “इस्रो’ सेंटरमध्ये उपस्थित राहतील, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या (इस्रो) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
चंद्रावर अब्जावधी स्वप्ने घेतल्या गेलेल्या “चांद्रयान-2’च्या यशस्वी लॅंडिंगमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप लॅंडिंग करणारा रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत चौथा देश बनेल. आतापर्यंत उघड न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवासाठी मिशन सुरू करणारा हा पहिलाच देश असेल.
लॅंडरच्या ऑन-बोर्ड प्रोपल्शन सिस्टमचा वापर करून दोन दिवसांतला दुसरा-नऊ सेकंदांचा “डी-ऑर्बिटिंग’ हालचाल पहाटे 3.42 वाजता झाली. या यशस्वी हालचालीमुळे विक्रम लॅंडरने चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने उतरण्यासाठी आवश्यक कक्षा साध्य केली आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.
लॅंडर आता एका कक्षामध्ये आहे जे चंद्राच्या पृष्ठभागापासून जवळ जवळ 35 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणावरून ते चंद्रावर अंतिमतः उतरण्यास सुरूवात करेल. असे “इस्रो’ने म्हटले अहे.