लवकरच बाजारात दाखल होत आहे ‘स्मार्ट ब्लँकेट’
स्मार्टफोन पासून ते स्मार्ट वॉचपर्यंत अनेक गोष्टी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. एवढेच काय तर स्मार्ट शर्ट्स देखील बाजारात आले आहेत. आता यातीलच पुढील टप्पा म्हणजे, चीनी स्मार्टफोन निर्मिता कंपनी शाओमीने इलेक्ट्रिक ब्लँकेट लाँच केले आहे.
कंपनीने हे इलेक्ट्रिक ब्लँकेट क्राउडफंडिगद्वारे बनवले आहे. याआधी कंपनीने इलेक्ट्रिक हिटर वनएससोबत Chanitex स्मार्ट टेंपरेचर कंट्रोल्ड मॅट्रेस लाँच केले होते. शाओमी लवकरच स्मार्ट ब्लँकेट भारतीय बाजारात देखील विक्री करण्यास सुरूवात करणार आहे.
शाओमीने युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन या ब्लँकेटची डिझाईन अगदी साधी ठेवली आहे. ग्राहक हे ब्लँकेट ग्रॅफीन आणि इलेक्ट्रिक हिटिंग वायरसोबत देखील खरेदी करू शकतील. याशिवाय ग्राहकांना यामध्ये 24 वॉल्टचे इनपूट मिळेल. जे हे ब्लँकेट सुरक्षित ठेवते.
रिपोर्ट्सनुसार, हे स्मार्ट ब्लँकेट 80×150 आणि 150×170 cm आकारात उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये स्मार्ट स्लीप मोड मिळेल. जे युजर आणि ब्लँकेटचे तापमान एक समान ठेवेल.
ग्राहक हे स्मार्ट ब्लँकेटचा XiaoAI वॉइस असिस्टेंट आणि MIJIA अॅपद्वारे वापर करू शकतील. या ब्लँकेटला कोठून ही ऑपरेट करता येते. या इलेक्ट्रिक ब्लँकेटच्या सिंगल व्हर्जनची किंमत 199 युआन (2000 रूपये ) आणि ग्रॅफीन पॅड असणाऱ्या ब्लँकेटची किंमत 399 युआन (4000 रूपये) आहे. चीनमध्ये 29 नोव्हेंबरपासून या ब्लँकेटची विक्री सुरू होईल.