चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी बनविली 1 लीटरमध्ये 121 किमी धावणारी कार

frame चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी बनविली 1 लीटरमध्ये 121 किमी धावणारी कार

Thote Shubham

चेन्नईच्या एसआरएम युनिवर्सिटीच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या 31 विद्यार्थ्यांच्या टीमने 1 लीटर पेट्रोलमध्ये 121 किलोमीटर अंतर पार करणारी सिंगल सीटर कार तयार केली आहे. कारचे प्रोटोटाइप मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान बंगळुरू येथे होणाऱ्या  शैल इको मॅरोथॉन इंडिया येथे प्रदर्शित होईल.

या ठिकाणी कारची क्षमता तपासली जाईल. जर ही कार यशस्वी झाली तर कार आशिया शैल इको मॅरोथॉनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. ही कार बनविण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागला.

टीमने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पॉकिट मनीच्या पैशातून रक्कम जमा केली. जवळपास अडीच ते तीन लाख रूपये ही कार बनविण्यासाठी खर्च आला. या कारची बॉडी एकदम हल्की असून, कार्बन फायबर आणि एल्युमिनियमपासून बनविण्यात आली आहे. याचे इंजिन 50 सीसी आहे.

अजमेरच्या हरदित्य सिंहने सांगितले की, कार बनविण्यामध्ये संपुर्ण टीमचे योगदान आहे. अनेक वेळा अपयश आले, मात्र अखेर आता कार तयार आहे.


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More