युट्यूबने युजर्ससाठी आणले हे खास फीचर

Thote Shubham

व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्यूबने आपल्या मोबाईल अपमध्ये टिव्ही स्क्रीन, गेम कंसोल आणि अन्य स्ट्रिमिंग डिव्हाईसेजसाठी अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. युट्यूबने आता आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये एका नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे.

 

युजर आता स्मार्ट टिव्हीवर युट्यूबला कास्ट करताना मोबाईलवर वॉईस सर्चचा वापर करू शकणार आहेत.युट्यूबच्या या नवीन फीचरमुळे कंटेट शोधणे अधिक सोपे होणार आहे. हे फीचर अँड्राईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. प्लेस्टेशन 4 आणि प्लेस्टेशन 4 प्रो वर एचडीआरमध्ये देखील व्हिडीओ पाहता येणार आहे.

 

युट्यूबने आणखी एक नवीन फीचर हू इज वॉचिंग सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स लिंक वेगवेगळ्या युट्यूब प्रोफाईलमध्ये बदलू शकतील. युट्यूब वेगवेगळ्या प्रोफाईलच्या सर्च हिस्ट्रीच्या आधारावरच तुम्हाला व्हिडीओ रिकमेंट करेल.

Find Out More:

Related Articles: