
शाओमीने आणला यूनमी इंटरनेट रेफ्रिजरेटर
चीनी कंपनी शाओमीने ग्लोबल मार्केट मध्ये यूनमी नावाने इंटरनेट रेफ्रिजरेटर सादर केला असून थ्री डोअर डिझाईनच्या या रेफ्रिजरेटरची क्षमता ४०८ लिटर आहे. या रेफ्रिजरेटरच्या दरवाजावर २१ इंची स्क्रीन दिला गेला असून युजर त्याच्या मदतीने नवीन रेसिपीची माहिती मिळवू शकतो इतकेच नाही तर तो पदार्थ कसा करायचा याचे प्रात्यक्षिक पाहू शकतो. या रेफ्रिजरेटरला व्हॉईस कमांड सपोर्ट दिला गेला आहे.
या स्मार्ट रेफ्रिजरेटरवरील स्क्रीनवरून युजर हवामानाची माहिती, रेफ्रिजरेटरच्या आतील तापमान या विषयी प्रश्न विचारून माहिती घेऊ शकतोच पण ताजी फळे, भाज्या यांची ऑर्डर देऊ शकतो. त्यासाठी फक्त सिंगल टच करावा लागतो. शाओमीने क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म वर हा रेफ्रिजरेटर लिस्ट केला आहे आणि त्याच्या स्पेशल क्राउडफंडिंगची किंमत ५१ हजार रुपये आहे.
या रेफ्रिजरेटर मध्ये तीन स्टोरेज सेक्शन आहेत. १८० लिटरचा फ्रीझर, ९५ लिटरचा व्हेरीएबल टेम्परेचर एरिया त्याला दिला गेला आहे. हा रेफ्रिजरेटर स्मार्टफोन सह घरातील अन्य स्मार्ट डिव्हायसेसशी कनेक्ट करता येतो.