
या ठिकाणी तयार होत आहे जगातील सर्वात उंच झोका
जगातील सर्वात मोठा झोका तयार करण्याचे काम सध्या दुबईच्या ब्लूवॉटर्स आयलँड येथे सुरू आहे. हा झोका 5 बोइंग 747 जंबो जेट एवढा वजनदार आणि लंडन आय (135 मीटर उंच झोका) पेक्षा दुप्पट मोठा आहे.
हा झोका 250 मीटर उंच असून, यामध्ये 48 पॉड्स आहेत. ज्यात 1900 लोक एकाचवेळी बसून झोका घेऊ शकतात. चार खांबांच्या स्ट्रक्चरवर उभा असलेल्या या झोक्याच्या एका खांबाचे वजन बोइंग 7X7 जंबो जेटच्या वजनाएवढे आहे. याचे वजन 900 किलो आहे. एका खांबाची उंची 125 मीटर आहे.
प्रोजेक्ट मॅनेजर पीयर्स सिडेने सांगितले की, जगभरात अनेक उंच झोके आहेत, मात्र हा झोका त्यांच्यापेक्षा 50 टक्के अधिक मोठा आहे. जेव्हा हा झोका तयार होईल तेव्हा इतरांपेक्षा 200 टक्के अधिक उंच असेल. सध्या जगातील सर्वात उंच 167 मीटरचा झोका लॉस वेगासमध्ये आहे.
या झोक्यासाठी मटेरियल दुबईपर्यंत जहाजेने आणण्यात आले. यासाठी जगातील सर्वात उंच क्रेनची मदत घेण्यात आली. हा झोका दुबईचे मानव निर्मित बेट ब्लूबॉटर्स आयलँडवर लावण्यात येत आहे. हे बेट 2013 ला सुरू झाले होते. या वर्षाच्या अखेरपर्यंत या झोका तयार होईल.