बहुप्रतिक्षित ‘गॅलेक्सी नोट 10 लाईट’ भारतात लाँच

Thote Shubham

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन गॅलेक्सी नोट 10 लाईट भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये गॅलेक्सी नोट 10 प्रमाणेच फीचर्स आहेत. मात्र किंमत त्यापेक्षा कमी ठेवण्यात आलेली आहे.

 

गॅलेक्सी नोट 10 लाईटच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 40,999 रुपये आहे. या फोनला ऑरा ग्लो, ऑरा ब्लॅक आणि ऑरा रेड रंगात लाँच करण्यात आले आहे. 21 जानेवारीपासून प्री बुकिंग सुरू होईल. 2 फेब्रुवारीपासून ऑफलाइन व ऑनलाईन फोनची विक्री सुरू होईल.

 

गॅलेक्सी नोट 10 लाईटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसोबत एस पेन देण्यात आला आहे. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर याद्वारे व्हिडीओ प्रेजेंटेशन कंट्रोल करता येते. रिमोट कंट्रोलर म्हणून याचा वापर करता येईल. यात एअर कमांड देण्यात आले आहे. सेल्फी आणि फोटो क्लिक करण्यासाठी देखील तुम्ही एस पेन फीचरचा वापर करू शकतात. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फूल एचडी+ ओलेड डिस्प्ले मिळेल. कंपनीने यासाठी Infinity O पॅनेलचा वापर केला आहे. यामध्ये सॅमसंगचेच Exynos 9810 प्रोसेसर मिळेल.

 

गॅलेक्सी नोट 10 लाईटमध्ये 6जीबी रॅमसोबत 128 जीबी स्टोरेज मिळेल. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 1टीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी मिळेल, जी फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

 

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. यात पहिला कॅमेरा 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस, दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल एंगल लेंस आणि तिसरा कॅमेरा देखील 12 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी यात फ्रंटला 32 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय यासारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आलेले आहे. तसेच टाइप सी कनेक्टर आणि हेडफोन जॅक देखील मिळेल.

 

Find Out More:

Related Articles: