
15 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता हे शानदार स्मार्ट टिव्ही
सध्या बाजारात स्मार्ट टिव्हीची मागणी वाढली आहे. शाओमी, सॅमसंग सारख्या अनेक कंपन्या आता बाजारात स्मार्ट टिव्ही लाँच करत आहे. या टिव्हीमध्ये अनेक खास कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळत असतात. जर तुम्ही देखील स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला असेच काही स्मार्ट टिव्ही सांगणार आहोत, ज्यांची किंमत 15 हजारांपेक्षाही कमी आहे.
सॅमसंग एचडी रेडी एलईडी (32 इंच) –
सॅमसंगच्या या टिव्हीची खरी किंमत 22,500 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा टिव्ही केवळ 13,999 रुपयांना मिळत आहे. फीचर्सबद्दल सांगायचे तर हा टिव्ही 32 इंच एलईडी डिस्प्ले सोबत येतो. ज्याचे रिजोल्युशन 1366 x 768 पिक्सल आहे. ग्राहकांना यामध्ये युट्यूब, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार सारखे अॅप्स देखील मिळतील.

एमआय एलईडी (32 इंच) –
शाओमीचा हा टिव्ही फ्लिपकार्टवर 12,499 रुपयांना मिळत आहे. यामध्ये 32 इंच डिस्प्ले देण्यात आला असून, ज्याचे रिजोल्युशन 1366 x 768 पिक्सल आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, हेडफोन जॅक, यूएसबी आणि एचडीएमआय सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ईएअरटेक 40 इंच स्मार्ट एलईडी –
ईएअरटेकच्या या 40 इंच टिव्हीची किंमत 13,299 रुपये आहे. यात 2 एचडीएमआय पोर्ट व 1 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. यात 20 वॉटचा स्पीकर देखील मिळेल. हा टिव्ही अॅमेझॉनवरून खरेदी करता येईल.

थॉम्सन स्मार्ट टिव्ही (32 इंच) –
थॉम्सनच्या या 32 इंच टिव्हीची किंमत 9,999 रुपये आहे. याचा मॉडेल नंबर 32एम3277 प्रो आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी एचडीएमआय आणि यूएसबी सपोर्ट मिळेल. सोबत यूट्यूब, नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारखे अॅप्स मिळतील.
शिन्को एचडी स्मार्ट एलईडी टिव्ही –
शिन्कोचा हा 32 इंच टिव्ही 9,999 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. या टिव्हीमध्ये युजर्सला 2 एचजीएमआय, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कंसोल आणि कनेक्टिव्हिटीसाठी 2 यूएसबी पोर्ट मिळतील.