शाओमी के ३० प्रो मध्ये नाही १०८ एमपी कॅमेरा
स्पेनची राजधानी बार्सिलोना येथे २४ फेब्रुवारी पासून सुरु होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे फ्युचर टेक्नोलॉजीचे फोन सादर करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय युजर्समध्ये लोकप्रिय असलेल्या शाओमीने यंदा रेडमी नोट के ३० प्रो लाँच करण्याची तयारी केली असून या फोनची अनेक लिक्स यापूर्वी समोर आली आहेत. त्यानुसार या फोनला १०८ एमपीचा रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल असे सांगितले जात होते.
गिकबेंचवर हा फोन नुकताच लिस्ट केला गेला असून त्यात १०८ एमपी कॅमेरा सेटअपचा उल्लेख केला गेलेला नाही त्यामुळे या फोनला शाओमी १०८ एमपी कॅमेरा देणार नाही तर ६४ एमपीचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल असे म्हटले जात आहे. शाओमी त्यांचा पुढच्या फ्लॅगशिप फोन मी १० प्रो साठी १०८ एमपी कॅमेरा देईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. हा फोन सुद्धा मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये लाँच केला जाणार आहे असेही सांगितले जात आहे. हा फोन फोर जी आणि फाईव्ह जी सपोर्ट सह येईल.
शाओमीने रेडमी के सिरीज मध्ये २०१९ या वर्षात के २०, के २० प्रो हे मिडप्राईज रेंज फोन सादर केले होते आणि त्यांना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यात स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर आणि ४८ एमपीचा रिअर तर पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला गेला होता.