‘रिअलमी’ने लाँच केला स्वस्तातला स्मार्टफोन
स्मार्टफोन कंपनी रिअलमीने आपला नवीन स्मार्टफोन रिअलमी सी3 (Realme C3) लाँच केला आहे. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा, मीडियाटेक हेलिओ जी70 प्रोसेसर असे फीचर्स मिळतील. कंपनीच्या या एंट्री लेव्हल फोनमध्ये इनबिल्ट डार्क मोड आणि रिव्हर्स चार्जिंग सारख्या फीचर्स सोबत येईल.
हा फोन 2 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आल असून, यातील 3 जीबी रॅम + 32 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. कंपनीची अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून हा फोन 14 फेब्रुवारीपासून खरेदी करता येईल.
रिअलमी सी 3 कंपनीचा पहिला असा फोन आहे जो रिअलमी यूआय सोबत येईल, जे अँड्राईड 10वर आधारित आहे. या फोनमध्ये इनबिल्ड डार्क मोडसोबत मीडियाटेक हेलिओ जी70 प्रोसेसर देखील मिळेल. फोनमध्ये 6.5 इंच वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ 89.8 टक्के आहे व डिस्प्ले कॉर्निला गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसोबत येतो.
फोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी रिव्हर्स चार्जिंग फीचरसोबत येते. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ड्युअल रिअर कॅमेरा मिळेल. ज्यात प्रायमेरी कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 2.4GHz वाय-फाय, यूएसबी ओटीजी, मायक्रो यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ 5 आणि जीपीएस सारखे स्टँडर्ड फीचर्स मिळतील.