गुगलला टक्कर देणार ह्युवाईचे ‘अ‍ॅप स्टोर’

Thote Shubham

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या आपल्या स्वतंत्र अ‍ॅप स्टोरला स्मार्टफोन कंपनी ह्युवाईने अखेर लाँच केले आहे. याला कंपनीने ‘ह्युवाई अ‍ॅपगॅलेरी’ नाव दिले आहे. ह्युवाईचे हे अ‍ॅप स्टोर सध्या 170 देशांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

 

कंपनीने दावा केला आहे की, ह्युवाई अ‍ॅप गॅलेरीचे मासिक अ‍ॅक्टिव युजर्स हे 4 कोटींपेक्षा अधिक आहेत. अ‍ॅप गॅलेरीच्या लाँचिंग वेळी कंपनीचे सीईओ रिचर्ड यू यांनी सांगितले की, कंपनी युजर्सच्या प्रायव्हेसीबद्दल गंभीर असून, अ‍ॅप गॅलेरी खूपच सुरक्षित आहे. सायबर सुरक्षेला प्रथम प्राथमिकता असेल. ह्युवाई अ‍ॅप गॅलेरी एक अ‍ॅप स्टोर आहे. ज्यात युजर्सला अनेक अ‍ॅप्स डाउनलोड करता येतील. याद्वारे कंपनीने गुगलच्या प्ले स्टोरला आव्हान निर्माण केले आहे.

 

ह्युवाईच्या अ‍ॅप गॅलेरीमध्ये 18 कॅटेगरी आहेत. ज्यात न्यूज, सोशल मीडिया, मनोरंजन अशा कॅटेगरींचा समावेश आहे. याशिवाय युजर्स आपल्या आवडीचे नाव देखील अ‍ॅपसाठी सुचवू शकतात व हे अ‍ॅप लाँच झाल्यानंतर युजर्सला त्याचे नॉटिफिकेशन मिळेल. मात्र अद्याप ह्युवाईच्या या अ‍ॅप गॅलेरीमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजरसारखे अ‍ॅप्स उपलब्ध नाहीत. मात्र यावर टिकटॉक, अ‍ॅमेझॉन, स्नॅपचॅट सारखे अ‍ॅप उपलब्ध आहेत.

 

Find Out More:

Related Articles: