चक्क अंतराळातून मोबाईलवर आला पहिला वहिला SMS
मोबाईल कम्युनिकेशनला अधिक चांगले बनविण्याच्या दिशेने ऐरोस्पेस स्टार्टअप कंपनी लिंकला (Lynk) मोठे यश मिळाले आहे. या स्टार्टअपने अंतराळातून पृथ्वीवरील एका स्मार्टफोनवर एसएमएस पाठविण्यात यश मिळवले आहे.
यासाठी कंपनीने पृथ्वीच्या सर्वाधिक जवळील सेटेलाईटला स्मार्टफोनशी कनेक्ट केले होते. लिंकचे म्हणणे आहे की, या कामगिरीमुळे पृथ्वीवरील 500 कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोनला डायरेक्ट ब्रॉडबँड सर्व्हिस देनेच्या मिशनला लवकर पुर्ण करण्यास फायदेशीर ठरेल.
लिंकचे सह-संस्थापक आणि सीईओ चार्ल्स मिलर म्हणाले की, ही कामगिरी 500 कोटी मोबाईल धारकांसाठी खास गोष्ट आहे. स्वस्त इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी देखील हे खास आहे.
अंतराळातून पृथ्वीवर संदेश पाठवण्याची कामगिरी 24 फेब्रुवारी 2020 ला करण्यात आली. ही चाचणी कंपनीने आपल्या पेटेंट सेल टॉवर इन स्पेस टेक्नोलॉजीद्वारे केले. हे तंत्रज्ञान लो-अर्थ ऑर्बिट नॅनोसेटेलाइटला थेट अनमॉडिफाइड मोबाईल फोनला थेट कनेक्ट करते. लिंकने ही चाचणी अनेकदा केली.
अंतराळातील लिंकच्या सेल टॉवरद्वारे लांब व ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल. कंपनी या प्रोजेक्टच्या व्यावसायिक लाँचसाठी काम करत असून, यासाठी कंपनी 30 मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्ससोबत भागिदारी केली आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत लोकांना अशी सर्व्हिस मिळण्यास सुरूवात होईल.