आता थेट एटीएमवरून करा जिओचे रिचार्ज
रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी एक खास सेवा सुरू केली आहे. युजर आपल्या प्रीपेड जिओ नंबरला वेगवेगळ्या बँकांच्या जवळपास 90 हजार एटीएममधून रिचार्ज करू शकणार आहेत.
युजर्सला ही सेवा देण्यासाठी जिओने 9 बँकांसोबत भागीदारी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात युजर्सला मोबाईल रिचार्ज करण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
जिओची ही सेवा स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, सिटी बँक, डीसीबी बँक, एयूएफ बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकच्या एटीएमवर उपलब्ध आहे. युजर्सला एटीएम मशीनद्वारे रिचार्ज करण्यासाठी मशीनमधील रिचार्ज पर्याय निवडून त्यात मोबाईल नंबर आणि एटीएम पिन टाकावा लागेल. यानंतर रिचार्जची रक्कम टाकावी. यानंतर युजरच्या खात्यातून रक्कम वजा होईल व मोबाईल रिचार्ज झालेले असेल.