हुवावेचा पॉपअप कॅमेरा असलेला स्मार्ट टीव्ही

frame हुवावेचा पॉपअप कॅमेरा असलेला स्मार्ट टीव्ही

Thote Shubham

चीनी स्मार्टफोन कंपनी हुवावे ८ एप्रिल रोजी त्यांच्या हुवावे पी ४० स्मार्टफोन सिरीजचे लाँचिंग करत असून याच वेळी कंपनी त्यांचा बिल्टइन पॉपअप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्ट टीव्ही, हुवावे व्हिजन सिरीज खाली सादर करणार आहे. चीनी मायक्रोब्लॉगिंग साईट विबोवर त्याची अधिकृत घोषणा केली गेली आहे.

 

अर्थात ही घोषणा करताना कंपनीने टीव्हीचे डीटेल्स दिलेले नाहीत. मात्र गेल्या वर्षी कंपनीने विजन स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केली होती त्यात ६५ आणि ७५ इंची टीव्ही सादर केले होते. त्यात ७५ इंची टीव्हीला पॉपअप कॅमेरा दिला गेला होता. नवीन टीव्ही याच टीव्हीचे पुढचे मॉडेल असेल आणि त्याचा स्क्रीन अधिक मोठा आणि कॅमेराही अधिक मोठा असेल असे सांगितले जात आहे.

 

हे टीव्ही भारतात लाँच केले जातील काय याचा खुलासा कंपनीने केलेला नाही. या टीव्हीची किंमत दीड लाखापर्यंत असेल आणि व्हिडीओ चॅटचा उत्तम अनुभव युजरला मिळेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. याचे कारण म्हणजे हा पॉप अप कॅमेरा १० डिग्रीने झुकू शकेल अश्या पद्धतीने फिट केला गेला आहे.

 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More