शाओमी गजब स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत

Thote Shubham

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी एक गजब स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत असून या फोनच्या डिझाईनसाठीचे पेटंट कंपनीने फाईल केले असल्याचे समजते. पेटंट संबंधातील कागदपत्रावरून या फोनच्या दोन्ही साईड राउंडेड डिस्प्ले सह असतील. या प्रकारच्या डिस्प्लेला वॉटरफॉल डिस्प्ले असे म्हटले जाते.

 

कंपनीचा हा फोन वॉटरफॉल डिस्प्ले सह असेल आणि फ्रंट कॅमेरा अंडरडिस्प्ले दिला जाईल. या फिचर मुळे स्क्रीनच्या दोन्ही साईड मध्ये ६० टक्के जादा स्क्रीन सरफेस मिळणार आहे. साईड कंट्रोल सह ९० डिग्री राउंडेड असा हा स्क्रीन असेल, रिअरला स्क्रीन असणार नाही. युजर्स कडून या प्रकारच्या फिचरला मोठी मागणी आहे हे लक्षात घेऊन फोनचे डिझाईन केल्याचे सांगितले जात आहे.

हा फोन शाओमी मी १० प्रोचा सक्सेसर असेल असेही समजते. जून २०१९ मध्ये कंपनीने अंडरस्क्रीन कॅमेरा असलेला प्रोटोटाईप शोकेस केला होता. कंपनीचा या फिचरसहचा नवा फोन १ वर्षात बाजारात येईल आणि तो या प्रकारचा पाहिलाच फोन असेल असा दावा केला जात आहे.

Find Out More:

Related Articles: