डेटिंगच्या नादात 65 वर्षीय व्यक्तीला बसला 73 लाखांना गंडा
मुंबईतील एका 65 वर्षीय व्यक्तीला फेक डेटिंग अॅपच्या नादात 73 लाखांना गंडा बसला आहे. नवी मुंबईतील खारघर पोलीस स्टेशनमध्ये फेक कॉल सेंटरशी संबंधित तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एक महिला आणि ट्रांसजेंडरचा समावेश आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तिघांनी मिळून या व्यक्तीकडून 73.5 लाख रुपये लुबाडले.
पोलिसांनी सांगितले की, सप्टेंबर 2018 ला स्नेहा नावाच्या महिलेने एका 65 वर्षीय व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला. तिने त्यांना डेटिंग सर्व्हिसबद्दल सांगितले. मेंबरशिप आणि रजिस्ट्रेशनसाठी मोठी रक्कम देखील वसूल केली आणि सांगितले की, डेटिंगसाठी मुलगी निश्चित ठिकाणी पोहचेल. मात्र असे काहीही झाले नाही.
65 वर्षीय व्यक्तीने त्यानंतर स्नेहा मेंबरशिप रद्द करण्यास सांगितले. यावर त्या महिलेने त्यांच्याकडून अधिक पैसे मागितले व त्यांच्याच विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. ती महिला म्हणाली की, पोलिसांनी सांगेल की हा व्यक्ती मुलींची मागणी करतो. एवढेच नाही तर खोटी लीगल नोटीस देखील व्यक्तीच्या घरी पाठवली.
65 वर्षीय व्यक्तीने सांगितले की, ते घाबरले होते. त्यांनी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये तब्बल 73.5 लाख रुपये ट्रांसफर केले. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई करत स्नेहा, अरनब दास, प्रबीर साहाला पकडले. सध्या पोलीस तपास करत आहेत.